Thursday, January 14, 2021

त्या दुर्देवी घटने नंतर विजया उन्मळून पडली होती.

नेहमी प्रमाणे त्या दिवशी विजया किसन चौधरी (अहमदनगर) स्वयंपाक करायला बसली,  अवघी 17 वर्षाची ती मात्र सर्व स्वयंपाक अगदी कसलेल्या सुगरणीसारखा करत होती, वडील पाहूण्यागावाला गेले होते, मोठी बहिण सुनिता, आणि आई घरी होती, विजयाने स्वयंपाकाची सगळी तयारी केली, आई अंगणात काहीतरी काम करत होती, इतक्यात घरातून विजयाचा  मोठ मोठ्याने किंचळण्याचा आवाज आला. आईने मुलीचे किंचाळणे ऐकून घरात धाव घेतली. घरातील दृश्य पाहून मोठ्याने हंबरडा फोडला, स्टोव्ह चा मोठा भडका झाला होता, आणि विजयाच्या गळ्यातील ओढणीने, कपड्यांनी पेट घेतला होता, जवळ असणारी सुनिता पाण्याच्या भांड्यांपर्यंत पोहोचली आणि अंगावर पाणी टाकून आग विजवण्याचा प्रयत्न केला. कपड्यांनी पेट घेतल्यामुळे शरीर मोठ्या प्रमाणावर भाजलं गेलं होतं. गळ्याची बरीच त्वचा भाजली होती. उडालेला गोंधळ आणि आवाजाने वस्तीतले लोक जमले आणि विजयाला उपचारासाठी अकोले ग्रामिण रुग्णालयात घेवून गेले,  मात्र जास्त भाजल्या मुळे, मोठ्या दवाखान्यात घेवून जाण्याचे सुचवले, त्या नुसार प्रवारा लोणी येथील रुग्णालयात नेली गेली. त्वचा 75 टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर होती, त्या ठिकाणी 1 महिन्याच्या उपचारानंतर डॉक्टरांनी जगण्याची शक्यता कमी असल्याने पेशंट घरी घेवून जाण्यास सांगीतले.

तीच्यावर घरीच उपचार सुरु केले, अन् सुदैवाने पुढील दोन- तीन महिन्यात ती बरी होवू लागली. मात्र तीच्या गळ्याची त्वचा हनुवटी आणि छातीला चिकटून गेली यामुळे तीला मानेची कसलीही हालचाल करणे अशक्य होवून बसले. आणि चेहऱ्याची त्वचा ताणल्यामुळे चेहराही विद्रूप दिसू लागला.

विजया डी.एड.चे शिक्षण घेत होती, तिची मान चिकटल्यामुळे मानेची पुर्ण हालचाल थांबली होती, दुर्देवाने तिच्यावर ओढावलेल्या या घटनेमुळे तीला अनेक ठिकाणी दुय्यम वागणूक मिळत गेली, मित्र मैत्रिणी अंतर ठेवून वागत होत्या, कधी कॅन्टीन मध्ये चहा नाष्टा घेताना तिला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती. पुढे डी.एड.चे शिक्षण पुर्ण झाले. नोकरीसाठी मुलाखती सुरु झाल्या मात्र  मुलाखती नंतर तिला हेच सांगीतलं जायचं की तु्म्ही प्राथमिक शाळेतील लहान-लहान मुलांना शिकवणार आहात जळलेली त्वचा आणि चिकटलेली मान पाहून लहान मुले कदाचित घाबरु शकतात.

मुलाखती नंतर प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू घेऊन विजया बाहेर पडायची. डीएड ला ऍडमिशन घेताना जी स्वप्न रंगवली होती ती सगळी स्वप्ने आयुष्यात आलेल्या एका दुर्देवी घटनेमुळे धुळीस मिळत होती. आपला विद्रूप दिसणारा चेहरा आणि चिकटलेली मान या मुळे तीला कुठे सार्वजनिक कार्यक्रमात किवा इतर कामासाठी बाहेर जाण ती टाळू लागली

 घरी आई वडीलांना आपल्या मुलीच्या लग्ना बद्दल काळजी वाटत होती, विजया दिसायला सुंदर होती मात्र चिकटलेली मान आणि चेहऱ्याच्या ताणलेल्या त्वचे मुळे तिच्या लग्नाला अडथळा येवू शकेल असे वाटत होते, घरात चिंता दाटून होती.

अहमदनगर शहरात भारतीय जैन संघटना, सिव्हील हॉस्पिटल आणि चांदमल मुनोत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर आयोजित केले असल्याचे बॅनर लावलेले दिसले, फाटलेले ओठ- टाळू, चेहऱ्यावरील डाग, अशांवर मोफत प्लॅस्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती त्यात होती. हे शिबीर नगरच्या सरकारी दवाखान्यात तीन दिवसांसाठी आयोजित केले जाणार असल्याचे आणि गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन त्यात करण्यात आले होते, विजया शिबीराच्या दिवशी सरकारी दवाखान्यात पोहचली मात्र तिथे गेल्यानंतर तिचा भ्रमनिरास झाला, कारण जळलेल्या त्वचेवर या शिबीरात शस्त्रक्रिया केली जात नसल्याचे सांगीतले.

ती आता नाराज झाली, शिबीराचे संयोजक शशिकांत मुनोत, आदेश चंगेडिया यांची तीने भेट घेतली आणि रडत-रडत आपली परिस्थिती सांगीतली, “माझे वडील शेतमजूरी करतात, खाजगी ठिकाणी जाऊन शस्त्रक्रिया  करुन घेणे आम्हाला परवडणारे नाही. माझ्या या व्यंगामुळे मला नोकरी मिळत नाही, भविष्यात माझ्याशी लग्न करायला कोणी तयार होणार नाही”, असे म्हणत ती रडू लागली, शशिकांत मुनोत आणि आदेश चंगेडिया यांनी तिची समजूत काढली, “या ठिकाणी भाजलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया नाही केली जात, त्या साठी वेगळी तयारी करावी लागते”. मात्र विजयाच्या डोळ्यातील अश्रू, आणि शस्त्रक्रिया नाही झाली तर भविष्यात तिला येणारी आव्हाने मुनोत सरांनी ताडली आणि मग चांदमल मुनोत ट्रस्टचे किशोर जी मुनोत यांच्याशी सल्ला मसलत करुन विजया बद्दलची माहिती बीजेएसचे संस्थापक श्री. शांतिलालजी मुथ्था यांच्या कानावर घातली, लग्नाच्या वयात आलेली तरुण मुलगी, तिच्या या समस्ये मुळे लग्न आणि नोकरीच्या बाबतीत अडथळा निर्माण होईल ही बाब जाणली आणि मुथ्था सर यांनी शिबिरासाठी उपस्थित असलेले डॉक्टर राज लाला सर यांच्याशी फोन वरुन चर्चा केली.

या सर्जरी साठी शिबीरातील वेळ देणे अशक्य होतें कारण, सर्व रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना ऑपरेशन साठी तिन दिवसातील वेळ दिली गेली होती आणि त्यातली वेळ काढणे अशक्य होते, त्यात विजयावरील या शस्त्रक्रियेसाठी सलग सात तासाचा अवधी लागणार होता त्यामुळे या संदर्भात डॉ. राज लाला सर यांनी त्यांच्या टीम मधील इतर डॉक्टरांशी चर्चा केली, शिबीर समाप्तीनंतर समारोपाचा कार्यक्रम न करता ती वेळ वाचवून आणि डॉक्टरांचा आराम करायची वेळ असे मिळून सहा तास एकुण पाच डॉक्टरांनी मिळून प्लॅस्टिक सर्जरी करण्याचे ठरले, त्यानुसार या एका प्लॅस्टिक सर्जरीसाठी मोठी तयारी करावी लागणार होती,  त्यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे आणि मेडिकल उपलब्ध करावी लागणार होती. तशी सूचनाही बीजेएसला केली. त्या नुसार शस्त्रक्रियेसाठी लागणारी सगळी उपकरणे आणि इतर औषधांची व्यवस्था भारतीय जैन संघटनेनी केली.

विजयाच्या आई वडीलांना खूप आनंद झाला, आपल्या मुलीचे ऑपरेशन होणार आणि ती पहिल्या सारखी दिसू लागेल. दुर्देवी घटनेने हिरावून घेतलेला आनंद तिच्या चेहऱ्यावर पुन्हा खुलून उठेल या कल्पनेनेच विजयाचे आई वडील आनंदी झाले होते.

तीन दिवसाचे शिबीर संपन्न झाल्यानंतर ही प्लॅस्टिक सर्जरी करायला घेतली, या शिबिरासाठी आलेल्या पाच डॉक्टरांनी मिळून ही शस्त्रक्रिया करायचे ठरले त्या मुळे सहा तासांतच पुर्ण होवू शकणार होती. श्वास नलिका, अन्न नलिकेच्या जवळ ही सर्जरी असल्याने काही धोका पोहचू नये म्हणून टप्याटप्याने करायची ठरले.

  अशा प्रमाणे डिसेंबर 2015 रोजी विजयाच्या मानेच्या एकत्र झालेल्या नसा सोडवल्या गेल्या आणि पहिली शस्त्रक्रिया पुर्ण झाली, त्यानंतर 2015 ते 2018 या काळात टप्याटप्याने शस्त्र क्रिया पार पडली. या शस्त्र क्रियेनंतर तीच्यावर लक्ष ठेवून काळजी घेणे गरजेचे होते,  मग बीजेएसच्या वतीने मुनोत सर विजयाच्या संपर्कात राहून तिच्या तब्येतीची विचारपूस करत आणि  ड्रेसिंग बद्दल सुचना देत काही त्रास होतोय का जाणून घेत होते आणि तिच्या तब्बेतीचा रिपोर्ट डॉ. राज लाला (अमेरिका) यांना देत असत.

आता विजया आपली मान पहिल्या सारखी वळवू शकत होती, वर उचलू शकत होती. आकसलेली चेहऱ्याची त्वचा देखील पूर्ववत झाली होती.

ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर विजयाच्या आई वडीलांनी जेव्हा पहिल्यांदा विजयाला पाहिली तेव्हा दोघांचेही डोळे भरुन आले. ते दोघेही बीजेएस ला मनापासून धन्यवाद देवू लागले डॉक्टरांच्या आणि बीजेएसच्या पदाधीकाऱ्यांच्या ते अक्षरशः पाया पडू लागले.

या प्लॅस्टिक सर्जरीनंतर विजयाच्या आयुष्यात पहिल्या सारखा आनंद निर्माण झाला. तिच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने तरळू लागली.

डिसेंबर 2020 ला विजयाचं लग्न झालं, तिच्या मनासारखा तिला जोडीदार मिळाला.

विजया आज तिच्या या दुर्देवी घटने बद्दल बोलताना फार भावूक होते ती म्हणते की  “ माझ्या चिकटलेल्या मानेवर जर शस्त्रक्रिया केली नसती तर मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असते, मी एका शाळेत आता शिकवत आहे, नोकरी करण्याचे माझे स्वप्न साकार झाले आणि आई बाबांना माझ्या लग्नाची काळजी होती ती काळजीही मिटली आहे, डिसेंबर 2020 मध्ये माझं लग्न झालं आहे, भारतीय जैन संघटना, चांदमल मुनोत ट्रस्ट ने फक्त चिकटलेल्या मानेवर शस्त्रक्रिया केली नाही तर माझ्या आयुष्यातील दुःखावर शस्त्रक्रिया करुन आमच्या कुटुंबात आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे. मी कायम त्यांच्या ऋणात राहीन

Wednesday, January 6, 2021

तेव्हा परीचा पहिला वाढदिवस कोविड केअर सेंटर मध्ये साजरा झाला.

 तेव्हा परीचा पहिला वाढदिवस कोविड केअर सेंटर मध्ये साजरा झाला.


परीचा आज पहिला वाढदिवस होता त्यामुळे घरगुती तयारी सुरु होती, लॉकडाऊन आणि कोरोनामुळे वाढदिवस मोठ्या प्रमाणावर नाही पण घरातील लोक आणि नात्यातील आठ दहा लोकांत हा वाढदिवस साजरा करायचे ठरवले, जवळ जवळ सगळी तयारी झाली होती. परी साठी कपडे, तिच्या आवडीची खेळणी तर इतरांसाठी रिटर्न गिफ्ट आणि रात्री सुग्रास जेवण असा बेत ठरला आणि त्याची 90 टक्के तयारीही झाली.

 याच वेळी सकाळी-सकाळी हडपसर येथे, भारतीय जैन संघटने मार्फत कोविडची मोफत तपासणी करणारी डीस्पेन्सरी व्हॅन आल्याचे समजले. लक्षणं फार नसली तरी वडील दीपक  यांना थोडी शंका आली म्हणून त्यांनी स्वतःची तपासणी करुन घेण्यासाठी त्या व्हॅन पर्यंत पोहचले. आणि त्यांची शंका खरी ठरली एन्टीजेन टेस्ट केल्यानंतर ते पॉझीटीव्ह आढळले,त्यांच्या समोर त्यांच्या लाडक्या लेकीचा चेहरा दिसु लागला, तिच्या  वाढदिवसाच्या तयारीचे चित्र उभे राहीले, लेकीचा पहिला वाढदिवस अगदी आनंदात साजरा करायचे मनात ठरवलेले असताना अन् तशी तयारीही केली असताना कोविडने या आनंदाच्या क्षणांना भंग केले…

 पण आता या सगळ्याला धीराने तोंड द्यायचे ठरवले, दीपक ने घरच्यांना तपासणी करण्यासाठी बोलवून घेतलं. आणि जी भिती मनात होती तेच झालं, बायको आणि मुलीचाही रिपोर्ट पॉझिटिव आला. 

  

दीपक ने आपल्या पत्नीला धीर दिला, आता दोघांनाही चिंता होती ती आपल्या मुलीची.

डॉक्टरांनी अलगीकरण आणि पुढील उपचारासाठी विमान नगर पुणे येथील कोविड केअर सेंटर मध्ये भरती होण्यास सांगीतले आणि लगेच ते तिघे भरती झाले. दैनंदिन लागणाऱ्या सर्व वस्तू त्यांना पुरविल्या गेल्या, तिथे गेल्यानंतर अन्य तपासणी आणि औषध गोळ्याही देण्यात आल्या. पण राहून राहून एक गोष्ट दीपक आणि त्यांच्या पत्नीच्या मनात सलंत होती ती म्हणजे परीचा पहिला वाढदिवस आपण साजरा करु शकत नाही याची.

कोविड केअर सेंटर मध्ये भरती झाल्यानंतर तेथील नर्सना समजलं की परीचा पहिला वाढदिवस आहे. हळू हळू ही बातमी डॉक्टर, स्वयंसेवकांपर्यत पोहचली आणि मग साजेरीचा वाढदिवस साजरा करायचे ठरले. 

केक आणला गेला आणि कोविड केअर सेंटर मध्येच परीचा वाढदिवस साजरा केला गेला. हया दृष्याने दीपक आणि त्यांची पत्नीच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.


कोविड केअर सेंटर बद्ल दीपक सांगतात की सुनियोजित पद्धतीने आणि प्रेम पुर्वक व्यवहाराने कोविड केअर सेंटर मधील  वातावरण फार सकारात्मक वाटत होते.

 सकाळी उठल्यानंतर योगा, त्यानंतर सकस नाष्टा फळे, जेवण आणि दररोज आरोग्य तपासणी केली जायची.या सोबतच येथे दिला जाणारा धीर मनाला हलकं करुन जायचा,

पेशंट मानसिक स्तरावर लवकर कव्हर होणे गरजेचे म्हणून विपश्यना संवादासारखे उपक्रम या सेंटर मध्ये राबवले जायचे, यात आपल्या मनाची ताकद समजून यायची आणि लवकर बरे होण्यास खुप मोठी मदत व्हायची,


डॉक्टर नर्स स्वयंसेवक सगळेजण फार काळजी घेत होते, मी त्यांना किती-किती धन्यवाद द्यावे कारण देशाच्या प्रति सिमेवर जीवाची पर्वा नकरता लढणारा जवान आणि इथे कर्म हेच धर्म समजून देशवासीयांची सेवा करणारे  डॉक्टर आणि स्वयंसेवक सिमेवर लढणाऱ्या जवानां इतकेच आदर्श वाटतात.


भारतीय जैन संघटना आणि विविध सामाजीक संस्थांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या विमान नगर येथील कोविड केअर सेंटर मधून हजारो कोरोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत. या ठिकाणी चहा, नाष्टा, जेवण, आणि औषधोपचाराची मोफत व्यवस्था केली जात होती. कोरोना काळात सामान्य माणसांसाठी हे कोविड केअर सेंटर खूप मोठा आधार ठरला आहे.


योग्य उपचार आणि येथील डॉक्टर स्वयंसेवकांनी घेतलेल्या काळजी मुळे अवघ्या एका वर्षाच्या परीने कोरोनाला हरवलं होतं, दहा दिवसाच्या उपचारानंतर पुन्हा तपासणी केली गेली यात  तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आले, आता सगळी काळजी घेवून यांना घरी सोडले जाणार होते.  कोरोना झाल्याने कोविड केअर सेंटर मध्ये चिंता घेवून आलेला हा  परिवार आज आनंद घेवून घरी परतणार होता.

 घरी सोडण्याच्या दिवशी दीपक आणि त्यांची पत्नी आनंदीत होते पण थोडे भावुक देखील होते, येथील व्यवस्था, डॉक्टर, नर्स, स्वयंसेवकांचे सेवेप्रति समर्पण या मुळे त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहीले होते.


जाता जाता तेथील डॉक्टर, नर्स स्वयंसेवकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले, आणि म्हणाले की आमच्या कोरोना योद्धा परीचा पहिला वाढदिवस आमच्या कायम लक्षात राहील.


या कोविड केअर सेंटरने कोरोना काळात खूप मोठी जबाबदारी पार पाडली आहे, येथील सुनियोजन प्रेम पुर्वक व्यवहार आणि तितक्याच काळजीपूर्वक उपचाराच्या जोरावर हजारो रुग्ण या कोविड केअर सेंटर मधून बरे होवून गेले आहेत. 

या पैकी एक ती म्हणजे अवघ्या एक वर्ष वयाची परी..